जुना कडगाव रोडवरील घटना; दोन अल्पवयीन संशयितांना अटक
जळगाव: तालुक्यातील जुना कडगाव रोडवरील शेतात दिनांक १० ऑगस्ट रोजी संदेश लिलाधर आढाळे (वय-२२, रा. भादली ता.जि.जळगाव) या तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्यातील गावातील दोन अल्पवयीन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या बहिणीची छेडखानी काढत असल्याकारणाने त्यांनी दोघांनी मयताचा काटा काढल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
सविस्तर वृत्त असेकी, जळगाव तालुक्यातील भादली ते जूना कडगाव रोडवरील पाटचारीला लागून असलेल्या शेतात संदेश आढाळे या तरुणाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर तरुणाच्या अंगावरील जखमांवरुन त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात संदेशच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अत्यंत बारकाईने या खुनाबाबत माहिती गोळा केली. तरुणाला आलेले फोन, त्याच्या संपर्कातील लोक यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले तर घटनेच्या दिवशी तरुण कुणासोबत बाहेर पडला याची माहिती काढल्यानंतर दोन अल्पवयीन संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची बारकाईने चौकशी केल्यानंतर संशयीतांनी खुनाची कबुली दिली. बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून हा प्रकार घडल्याची कबुली संशयीतांनी दिली आहे.
पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासचक्रे फिरविताच संदेश आढाळे याचा खून गावातीलच दोन अल्पवयीन तरुणांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या दोघ संशयितांना सोमवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी भादली गावातून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, संदेशचे बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून हा प्रकार घडल्याची कबुली संशयीतांनी दिली आहे. त्याच कारणावरुन त्या दोघांनी संदेशचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.