आदित्य ठाकरेंचा २० रोजी जळगाव जिल्हा दौरा

    दिनांक : 16-Aug-2022
Total Views |
जळगाव : युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे हे २० ऑगस्ट रोजी येणार असून त्यांच्या दौर्‍याचा अधिकृत तपशील जाहीर करण्यात आला आहे.

aditya-thackeray
 
शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आदल्या दिवशी अचानक त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे हा दौरा स्थगित करण्यात आला होता. यानंतर आता त्यांचा दौरा नव्याने जाहीर झाला असून ते शनिवार दिनांक २० ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत.
 
अधिकृत दौर्‍यानुसार आदित्य ठाकरे यांचे सकाळी १०.४० वाजता विमानतळावर आगमन होणार आहे. यानंतर आकाशवाणी चौकात त्यांचे शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने भव्य स्वागत होणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजता ते पाचोरा येथील सभेला हजेरी लावतील. तेथून त्यांचे एरंडोल येथे स्वागत होईल. तर पावणेदोन वाजता त्यांच्या उपस्थितीत धरणगावात शिवसंवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी तीन वाजता ते पारोळा येथील कार्यक्रमाला हजेरी लावतील. येथून ते धुळे येथे रवाना होणार आहेत.