मोठी बातमी.. संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ED कोठडी

    दिनांक : 01-Aug-2022
Total Views |
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.पीएमएलए कोर्टाने हा निर्णय़ दिला आहे . त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
 
 
 
ravut
 
 
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने 8 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने केवळ चार दिवसांची कोठडी मंजूर केली. राऊत यांना त्यांच्या वकिलांशी बोलण्याची सुविधा दिली जाईल, असे न्यायालयाने निकाल देताना सांगितले. ईडीला राऊतची औषधे इत्यादींची काळजी घ्यावी लागेल आणि चौकशीचे तासही निश्चित करावे लागतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.
 
सुनावणीदरम्यान संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयात सांगितले की, संजय राऊत यांची अटक हा राजकीय कटाचा भाग आहे. राऊत यांना हृदयाशी संबंधित समस्या असून, त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. न्यायालयात संबंधित कागदपत्रेही दाखविण्यात आली होती.
 
संजय राऊत यांना अनेकदा समन्स बजावले होते. मात्र समन्स बजावून सुद्धा हजर न राहिल्याने रविवारी ईडीने थेट संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी धाड टाकली होती. या कारवाईत ईडीने तब्बल 9 तास संजय राऊत यांची चौकशी केली. या चौकशीनंतर संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात अटक केली होती. तसेच ईडीने राऊत यांच्या च्या घरातून 11.5 लाख रुपये जप्त केले होते.