SBI कडून मोठी बातमी... ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल,जाणून घ्या

    दिनांक : 26-Jul-2022
Total Views |
फसवणुकीच्या वाढत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एसबीआयने नियमांमध्ये केला बदल
 
मुंबई : बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी ATM हे आजही सर्वाधिक पसंतीचे माध्यम आहे. एटीएमच्या अतिवापरामुळे त्याच्याशी संबंधित फसवणुकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. एटीएम बदलून किंवा एटीएम स्किमिंग करून फसवणूकदार लोकांचे खाते रिकामे करतात. याच पार्श्वभूमीवर एटीएमचे फसवे व्यवहार टाळण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नवा नियम लागू केला आहे. आता, एसबीआय ग्राहकांना व्यवहार पूर्ण करण्यासाठी एटीएममधून पैसे काढताना वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) प्रविष्ट करावा लागेल.
 
 

atm
 
 
 
 
बँका वेळोवेळी एटीएम वापराबाबत सूचना देत असतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील आता ट्विट करून ATM मधून पैसे काढताना OTP वापरण्याचा सल्ला दिला आहे. बँकेने 2020 पासून ही सेवा सुरू केली आहे, परंतु, बहुतेक ग्राहक OTP आधारित एटीएम व्यवहार करत नाहीत. स्टेट बँकेच्या एटीएममधून एका व्यवहारात १०,००० रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम काढणाऱ्या ग्राहकांना व्यवहार पूर्ण करण्यासाठी ओटीपी आवश्यक असेल.
 
ओटीपी वापरण्याच्या टिप्स
 
आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये, SBI ने ग्राहकांना ATM मधून पैसे काढताना OTP वापरण्याचा सल्ला दिला आहे. बँकेने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “एसबीआय एटीएममधील ओटीपी आधारित व्यवहार हे फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एक उत्तम शस्त्र आहे. फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.” SBI बँकेने 1 जानेवारी 2020 पासून OTP सेवा सुरू केली आहे. बँक ही माहिती वारंवार शेअर करते, जेणेकरून ती आपल्या ग्राहकांचे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करू शकेल.
 
ओटीपी वापरून पैसे कसे काढायचे:
 
- एसबीआय एटीएममधून पैसे काढताना तुमच्याजवळ तुमचे डेबिट कार्ड आणि मोबाईल फोन असणे आवश्यक आहे.
- तुम्ही तुमचे डेबिट कार्ड टाकल्यानंतर आणि पैसे काढण्याच्या रकमेसह एटीएम पिन टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपीसाठी विचारलला जाईल.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे ओटीपी प्राप्त होईल
- तुमच्या फोनवर मिळालेला ओटीपी एटीएम स्क्रीनवर टाका
- तुम्ही वैध ओटीपी टाकल्यानंतर व्यवहार पूर्ण होईल.