सोलापूरमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला अपघात , 15 ते 20 जण जखमी, 4 जण गंभीर

    दिनांक : 24-Jul-2022
Total Views |
सोलापूर : सोलापूरमध्ये (solapur) राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला अपघात (st bus accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली एसटी बस पलटी झाली आहे. या अपघातात 15 ते 20 जण जखमी झाले आहे. जखमींपैकी 4 जण गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 

apghat1 
 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर - गाणगापूर बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास बसला अपघात झाला आहे. पुलावरून जात असताना अचानक एसटी बस चालकाने नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. या अपघातात जवळपास 15 ते 20 प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये 4 जण गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने खासगी डॉक्टरांना देखील पाचरण करण्यात आलं आहे.
 
सोलापूर - गाणगापूर एसटी बसला अक्कलकोटजवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातातून जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. हा अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.