शिधापत्रिका धारकांसाठी मोठी बातमी ... आता एटीम मशीन मधून मिळणार धान्य !

    दिनांक : 21-Jul-2022
Total Views |
Rations from ATMs : सरकार नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून अनेक योजना राबवत आहे. वेगवेगळ्या योजनांची देखील अंमलबजावणी करत आहे. आता नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता सरकारने अन्न वितरण व्यवस्थेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
 
 

atm
 
 
 
एटीएम मधून पैसे काढता येतात, मात्र तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल कारण आता एटीएम मधून रेशन गहू तांदूळ काढता येणार आहे. आता रेशन धारकांना गहू तांदूळ सुद्धा एटीएम मधून मिळणार असून त्याची सुरवात ओरिसा सरकार करत आहे. रेशन डेपोवर ही एटीएम बसविली जाणार आहे आणि या एटीएम ला 'ग्रेन एटीएम' नाव देण्यात आले आहे.
 
ओडिशा सरकारने हा अनोखा आणि तितकाच महत्त्वपूर्ण उपक्रम प्रत्यक्षात आणला आहे. ओडिशा सरकार रेशन डेपोवर एटीएम मशीनप्रमाणे ऑल टाईम ग्रेन म्हणजेच एटीजी (ऑल टाइम ग्रेन) मशिनमधून रेशन देण्याची तयारी करत आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्य देण्यासाठी एटीजी मशीनचा वापर केला जाईल. अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री अतानु एस. नायक यांनी ही माहिती दिली. एटीजी मशिन हे एटीएमप्रमाणे असतील, मात्र त्यांच्यामार्फत धान्य पुरवले जाईल असं नायक यांनी सांगितलं.
 
लाभार्थ्यांना विशेष कार्ड
 
सुरुवातीच्या टप्प्यात शहरी भागात ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे नायक यांनी सांगितले. सर्व प्रथम भुवनेश्वरमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि राज्य अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना सेवेचा लाभ घेण्यासाठी विशेष कार्ड दिले जाईल.
 
धान्यं मिळविण्याची प्रक्रिया , जाणून घ्या -
 
रेशन कार्ड धारकाला आपला आधार नंबर आणि रेशनकार्ड (Aadhar Number and Ration Card) वरचा नंबर फीड केला कि एटीएम मधून योग्य धान्य मिळणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग भुवनेश्वर येथे केला जात आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अतनू सब्यसाची यांनी मंगळवारी या योजनेची घोषणा केली आहे व यासंबंधी विधानसभेत माहिती देखील दिली आहे. त्यामुळे लवकरच नगिरकांच्या सेवेत एटीएम मशीन येणार आहे.
 
गुरुग्राममध्ये देशातील पहिले 'ग्रेन एटीएम'
 
देशातील पहिले ग्रीन एटीएम गेल्या वर्षी हरियाणातील गुरुग्राममध्ये बसवण्यात आले होते. अन्न आणि पुरवठ्याची जबाबदारी असलेले हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले की, धान्याचे एटीएम बसवल्यानंतर सरकारी दुकानातून रेशन घेणार्‍यांचा वेळ आणि संपूर्ण मोजमाप यासंबंधीच्या सर्व तक्रारी दूर केल्या जातील. हे मशीन बसवण्याचा उद्देश "योग्य प्रमाणात योग्य लाभार्थी" असल्याचं त्यांनी म्हटलं. याचा फायदा केवळ ग्राहकांनाच होणार नाही, तर सरकारी डेपोवरील धान्य टंचाईचा त्रासही संपुष्टात येईल, असे त्यांनी म्हटलं.