भारताच्या या यशात अष्टपैलू हार्दिक पंड्याचा मोलाचा वाटा
मुंबई : इंग्लंडविरुद्ध Hardik Pandya खेळल्या गेलेल्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट होती. इंग्लंडने पहिल्यांदाच टी-20 आणि एकदिवसीय मालिका जिंकण्यात यश मिळविले. भारताच्या या यशात अष्टपैलू हार्दिक पंड्याचा मोलाचा वाटा होता. सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या हा भारतासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे, असे क्रिकेट तज्ज्ञ आकाश चोप्रा यांचे मत आहे.
हार्दिक पांड्याला Hardik Pandya इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब मिळाला. हार्दिक पांड्याने मालिकेतील निर्णायक सामन्यात केवळ चार विकेट घेतल्या नाहीत तर, त्याने ७१ धावांची महत्त्वपूर्ण खेळीही खेळली. आकाश चोप्रा म्हणाला की, हार्दिक पांड्या पूर्ण तंदुरुस्तीनंतर एक अप्रतिम खेळाडू बनला आहे. हार्दिक पांड्या आपली जबाबदारी समजून घेत आहे आणि भारतासाठी सामना पूर्ण करत आहे.
त्यामुळे हार्दिक पांड्यामध्ये बदल झाला
आकाश चोप्रा म्हणाला की, “हार्दिक पांड्या Hardik Pandya आता पूर्णपणे परतला आहे. हार्दिक पांड्या चांगली गोलंदाजी करत आहे. आता हार्दिक पांड्याकडे वेगळ्या दर्जाचा खेळाडू म्हणून पाहिले जाते. आयपीएलमध्ये मिळालेल्या जबाबदारीमुळे हार्दिक पांड्यामध्ये हा बदल झाला आहे. आता हार्दिक पांड्या Hardik Pandya फक्त फिनिशर राहिलेला नाही. संघ त्याच्याकडून आणखी मागणी करत आहे आणि तो ती पूर्णही करत आहे. हे भारतासाठी खूप चांगले आहे. हार्दिक पांड्या हा मर्यादित षटकांच्या मालिकेत भारतासाठी पहिल्या क्रमांकाचा परफॉर्मर आहे.