अखेर , झारखंडच्या जामतारा जिल्ह्यातील 'त्या' 40 शाळांनी साप्ताहिक सुट्टी केली रविवारी

    दिनांक : 14-Jul-2022
Total Views |
 
रांची : झारखंडच्या जामतारा जिल्ह्यातील सुमारे 40 शाळांनी weekly holiday साप्ताहिक सुटी रविवार ऐवजी शुक्रवारी केली होते. यामागील कारण या शाळेत असलेल्या एका विशिष्ट जातीच्या लोकांची संख्या लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला  होता. मात्र याबाबत सर्वत्र चर्चा आणि होत असलेला गदारोळ लक्षात घेता या सध्या शाळांनी आपला निर्णय बदलावला आहे. सादर शाळांनी साप्ताहिक सुट्टी शुक्रवार ऐवजी पुन्हा रविवारी केली आहे.
 

weekly off 
 
 
 
या शाळांनी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी देण्यास सुरुवात केली होती. जिल्हा शिक्षण अधिकारी अभय शंकर यांनी पीटीआय-भाषा या वृत्तसंस्थेला सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान, या शाळांना रविवार ते शुक्रवार या weekly holiday साप्ताहिक सुट्टीत बदल करण्याची सक्ती करण्यात आली होती. दरम्यान आता जिल्हा शाळा व्यवस्थापन समिती बरखास्त करण्यात आली असून लवकरच नवीन समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर शाळांना साप्ताहिक सुट्टी बदलण्यास भाग पाडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस नेते अजय कुमार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र लिहून या निर्णयाला जबाबदार असणा-या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
शाळांच्या नावात उर्दूही जोडण्यात आले
 
जामतारा जिल्ह्यातील कर्मतांड, नारायणपूर आणि जामतारा ब्लॉकमधील 100 प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना रविवार ऐवजी शुक्रवारी सुट्टी देण्यात येत weekly holiday असल्याची माहिती यापूर्वी आली होती. शाळांमधील मुस्लिम लोकसंख्येचा दाखला देत हा बदल करण्यात आला आहे. या शाळांमधील सुमारे 70% विद्यार्थी मुस्लिम समाजाचे आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, साप्ताहिक सुट्टीतील बदलाव्यतिरिक्त काही शाळांच्या नावांमध्ये 'उर्दू' हा शब्दही जोडण्यात आला आहे.
 
राज्य सरकारच बदलू शकते
 
यावर झारखंडचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो म्हणाले की, राज्यभरातील संबंधित अधिकाऱ्यांना एका आठवड्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी शाळा कोणत्याही स्थानिक दबावाखाली चालणार नसून नियमानुसार चालणार आहेत. weekly holiday दुसरीकडे जामतारा डीसी फाजी एक्यू अहमद मुमताज यांनी सांगितले की, आम्ही जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. काही नवीन असेल तर पूर्ण माहिती नाही. तपासण्यासाठी एक आठवडा द्या. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जामतारा जिल्ह्यात आठ प्राथमिक उर्दू शाळा आहेत. शाळेमध्ये कोणताही बदल, अगदी त्याच्या नावावरही, फक्त राज्य सरकार करू शकते.