ट्रेनचं LIVE स्टेटस ट्रॅक करणं आता आणखी सोपं, इथे मिळवा संपूर्ण माहिती
मुंबई : रेल्वेचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी रेल्वे वेगवेगळ्या सोयीसुविधा प्रवाशांसाठी आणत असते. देशात रेल्वेचं जाळ खूप मोठं आहे. खूप दुर्गम भागातही रेल्वेचं जाळं आहे. जिथे कदाचित रस्ते नसतील पण रेल्वे गेली आहे. रेल्वेनं रोज लाखो लोक प्रवास करतात. रेल्वेनं लांबचा प्रवास करणं खूप सोपं मानलं जातं. रेल्वे प्रवाशांच्या गरजा ओळखून त्यानुसार त्यावर काम करते.
कधीकधी असं होतं की ट्रेन उशिरा येते त्यामुळे प्रवाशांना तासंतास ताटकळत राहावं लागतं. आता प्रवाशांची ही गैरसोय ओळखून रेल्वेनं त्यांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतात दररोज हजारो-लाखो किलोमीटरचा लांबचा प्रवासही रेल्वेने ठरवला जातो. रेल्वेने लोकांना ही सुविधा देखील दिली आहे की लोक कोणत्याही ट्रेनची LIVE स्टेटस पाहू शकतात. हे स्टेटस तुम्ही चेक करू शकता याबद्दल जाणून घ्या
आता ट्रेनचं लाईव्ह स्टेटस तुम्ही मोबाईलवरूनही चेक करू शकता.
-रेल्वेच्या ऑनलाईन वेबसाईट उपलब्ध आहेत. तिथे जाऊन क्लीक करा.
- तुमच्या ट्रेनचा नंबर अपलोड करा.
- त्यानंतर तुम्ही पुढे प्रोसेस केली की तुम्हाला लाईव्ह स्टेटस दिसू शकतं.
ही ट्रेन किती मिनिटं उशिरा आहे किंवा ती किती वेळात कुठे पोहोचू शकेल याचाही अंदाज वर्तवलेला असतो. त्यामुळे तुम्हाला त्यानुसार नियोजन करणं अधिक सोपं जातं. कोणत्या स्टॉपवर ट्रेन किती वेळ थांबणार हे देखील तुम्ही इथे पाहू शकता.
https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ या साइटला भेट द्या. तिथे तुमच्या ट्रेनचा क्रमांक आणि नाव अपलोड करा. तुम्हाला स्टेशन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तारीख अपलोड करून लाईव्ह स्टेटस पाहू शकता.
यानंतर तुम्ही निवडलेल्या स्टेशनवर ट्रेन कधी येईल आणि तिथून कधी जाईल हे तुम्हाला दिसेल. यासोबतच त्या स्थानकावर गाडी येण्यास किती उशीर झाला, याची सर्व माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर कोणत्या स्टेशनवरून गाडी सुटली आहे, पुढचे स्टेशन कोणते आहे आणि पुढे कोणत्या स्टेशनला गाडी थांबणार आहे याचीही माहिती दिली जाते.