अबू सालेमचे Abu Salem 2005 मध्ये पोर्तुगालमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्याने आपल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, भारत सरकारने 2002 मध्ये पोर्तुगीज सरकारला वचन दिले होते की त्याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही किंवा कोणत्याही परिस्थितीत शिक्षा 25 वर्षांपेक्षा जास्त होणार नाही. पण मुंबईच्या विशेष टाडा कोर्टातून त्याला 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटासह दोन खटल्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या गुंडाने सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती की, त्याच्या सुटकेसाठी 2002 ही तारीख निश्चित करावी, कारण तेव्हाच त्याला पोर्तुगालमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानुसार 25 वर्षांची मुदत 2027 मध्ये संपत आहे.