वाढदिवसाला तलवारीने केक कापणे पडले महागात, गुन्हा दाखल

    दिनांक : 07-Jun-2022
Total Views |
नंदुरबार : जिल्ह्यातील प्रकाश येथील अजय विजय गावीत वय - २४ रा. मुंजळा हट्टी, प्रकाशा ता. शहादा जि . नंदुरबार याने वाढदिवसाचा दिवशी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे पडले महागात त्याचे विरुध्द् शहादा पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा व जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
 
crime 
 
 
वाढदिवसाचा तलवारीने केक कापल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायलर झाल्यानंतर अजय गावित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वाढदिवस साजरा करणे हा गुन्हा नाही परंतु तलवार किंवा धारदार शस्त्रांनी केक कापून वाढदिवस साजरा करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये . तलवार किंवा धारदार शस्त्रांनी कोणी केक कापून वाढदिवस साजरा करतांना आढळुन आल्यास किंवा दहशत पसरवितांना मिळून आल्यास त्यांच्याविरुध्द् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 
ही कारवाई पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस नाईक विकास कापुरे , पुरुषोत्तम सोनार, जितेंद्र अहिरराव, पोलीस कॉन्सटेबल / किरण मोरे , यशोदिप ओगले यांचे पथकाने केली असुन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.