शाळा उठल्या पालकांच्या जीवावर

    दिनांक : 28-Jun-2022
Total Views |


वेध

 


शिक्षणाचे बाजारीकरण parent vr school ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. या क्षेत्रात गल्लाभरू प्रवृत्तीचा झालेला शिरकाव अन् त्यामुळे निर्माण होणारी सुशिक्षित बेरोजगारांची फौज हे राष्ट्र उभारणीच्या कार्यात फार मोठा अडथळा ठरू शकते.

 
 
 
students

 

 
 
मानवी विकासासाठी शिक्षण हे एक मुख्य साधन असूनही आम्ही त्याकडे पाहिजे तेवढ्या गांभीर्याने बघत नाही. या क्षेत्राकडे समाजाने व शासनाने केलेले दुर्लक्षही त्यासाठी तेवढेच जबाबदार आहे.
 

राज्यातील बहुतांश parent vr school शाळांमध्ये गणवेश, पुस्तके व शालेय साहित्य विकले जाते. राज्यातील बहुतांश शाळांमध्ये याचा अनुभव जवळपास सर्वच पालकांना येतो. नफा कमविणारी ही विकृती अनेक शाळांमध्ये बर्‍याच वर्षांआधी निर्माण झाली. आता शाळाच 'दुकाने' बनल्याने गावागावांत असलेली शिक्षण साहित्याची दुकाने ओस पडू लागली आहेत.

अनेक दुकाने बंदही पडली आहेत. शाळांची ही हुकूमशाही पद्धत पालकांच्याही जीवावर उठली आहे. मुलांचा प्रवेश निश्चित झाला की, शालेय साहित्य अमुक एका दुकानातूनच खरेदी करण्याचे फर्मान सोडले जाते. त्यामुळे पालकांना नाईलाजास्तव चढ्या दराने हे साहित्य खरेदी करावे लागते. शिक्षण हे विकास व परिवर्तनाचे मुख्य साधन असून सामाजिक समता व आर्थिक विकासासाठी शिक्षणाला फार मोठे महत्त्व आहे. ही बाब राज्यघटनेतही अधोरेखित झाली आहे. 2009 साली शिक्षण हक्क कायदा अंमलात आला. मात्र, शिक्षणाच्या बाजारीकरणाकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.
 

शिक्षण क्षेत्रात माजलेल्या या बजबजपुरीने देशाचे आपण केवढे मोठे नुकसान करीत आहोत, याचे साधे भानही आपण ठेवत नाही. काँग्रेसच्या कार्यकाळात parent vr school आपल्या पदाधिकार्‍यांना खिरापतीसारख्या शाळा वाटल्या गेल्या. त्याचा त्यांनी बाजार मांडला. सामाजिक दायित्वाचे भान ठेवून चालणार्‍या शाळा राज्यात बोटावर मोजण्याएवढ्याच आहेत. वाटलेली ही खिरापतच आज राज्य व पालकांच्या मुळावर उठली आहे. त्यातही अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे फुटलेले पेव फारच चिंताजनक आहे. आज जर शासकीय शाळांकडे बघितले तर त्यांची झालेली दयनीय अवस्था सहज नजरेत भरावी एवढी आहे. शासकीय शाळेत मातृभाषेत मिळणारं फुकटचं शिक्षण आता पालकांनाही नको आहे. त्यामुळे खाजगी शाळांचे भाव वधारले आहेत. इंग'जीच्या मागे फरफटत जाऊन आपला खिसा रिकामा केला की, आपला मुलगा अमुक तमुक बनल्याचा आनंद पालकांच्या मुखावर ओसंडून वाहत असतो.

 

नेमकी हीच पालकांची parent vr school मानसिकता या शाळांनी हेरली अन् ते त्याचाच फायदा घेत आहेत. सध्याच्या डिजिटल युगात ई-कॉमर्सच्या वाढत्या प्रस्थाने आधीच ग्रामीण भागातील लहान लहान व्यावसायिक जेरीस आले आहेत. या क्षेत्रात खरेदीवर मिळणार्‍या विविध सवलतींमुळे ग्राहक आपल्या गावातील दुकानाकडून पूर्णपणे तुटला आहे. वरून शाळांनी थाटलेली ही नवीन दुकानदारी! त्यामुळे शालेय साहित्य विकणार्‍या लहान लहान दुकानदारांवर फार मोठे गंभीर संकट समोर उभे ठाकले आहे. शाळेमध्ये मिळणारे साहित्य फार दर्जेदार असेल असेही नाही. किंमत मात्र अव्वाच्या सव्वा! खाजगी शाळांमधील पुस्तक, गणवेश, बुट याची किंमत ऐकूनच पालकांना भोवळ यावी, एवढे दर. चौथीच्या मुलाचे या शाळेतील साहित्याचे दर कितीतरी हजारावर जाऊन थांबतात.

 

विद्यार्थी जसा जसा वरच्या वर्गात जाईल तसे तसे या साहित्याचे दरही वाढत जातात. इंग्रजी parent vr school माध्यमाच्या शाळांवर तर शासनाचे कोणतेच निर्बंध नाहीत. त्यामुळे सर्वत्र मनमानी सुरू आहे. अनेक पुढार्‍यांनी ही दुकाने थाटून आपल्या व्यवसायात भर घातली आहे. कार्यकर्त्यांची सोय, हाही उद्देश त्यामागे असू शकतो. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील ही घुसखोरी नक्कीच चिंताजनक आहे. राष्ट्राचे आधारस्तंभ घडविणारे हे क्षेत्र जर असे बरबटलेले असेल तर आजचा विद्यार्थी उद्या देशाचा आधार कसा बनू शकतो? या बाबीचे पालक म्हणून आम्ही कधी आत्मचिंतन करणार आहोत का? अन्यथा शाळेद्वारे पालक सर्रास असाच लुबाडला जाण्याचे प्राक्तन म्हणून आम्ही जगणार आहोत.

 
- चंद्रकांत लोहाणा
 

- 9881717856