आर. सी. पटेल आयएमआरडी बी.बी.ए. आणि बी.एम.एस.च्या विद्यार्थ्यांची कॅम्पस् प्लेसमेंट मध्ये निवड

    दिनांक : 13-Jun-2022
Total Views |
शिरपूर : येथील आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित आयएमआरडी परिसंस्थेतील पदवी विभागातील बी.बी.ए. व बी.एम.एस. च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची विविध कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड करण्यात आली.
 
kotwale 
 
इन्फोसीस बी.पी.एम. या कंपनीत बी.बी.ए. अंतिम वर्षाचे व्यास आराध्य प्रमोद, वाणी श्रेयश गिरीश, सोनार सागर भटू, पाटील प्रमोद प्रकाश, राजपूत नयन विजयसिंग, शिरसाठ प्रशांत हिरालाल, पाटील किर्तेश संजय, पवार मयूर राजेश, पाटील भूषण विकास या विद्यार्थ्यांची निवड झाली. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या कंपनीत बी.एम.एस. अंतिम वर्षाचे पित्रे अनुष्का विश्वास, एडकी ऋचा विनोद, पाटील दिव्या सुनील, जाधव मिहीर हरिओम, कलाल गोविंद विनोद व बी.बी.ए. अंतिम वर्षाचा कोठारी सुयश किशोर या विद्यार्थ्यांची निवड झाली. तर डाबर प्रायव्हेट लिमिटेड, बंगलोर या कंपनीत बी.एम.एस. अंतिम वर्षाची पाटील तेजस्विनी गोपाळ या विद्यार्थिनीची निवड झाली. यात पदवी विभागासाठी (बी.बी.ए व बी.एम.एस. ) सर्वोत्तम ३ लाख रुपये वेतनाचे पॅकेज मिळाले तर सरासरी पॅकेज २.४० लाख वेतनाचे मिळाले.
 
प्रथम फेरी मधे सर्व कंपनी द्वारे ऍप्टिट्यूड टेस्ट घेण्यात आली. ऍप्टिट्यूड टेस्ट मधे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन इंटरव्ह्यू घेण्यात आले. या प्रक्रीयेत आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित आयएमआरडी परिसंस्थेतील विद्यार्थ्यांची सर्व फेरीत निवड करण्यात आली. परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनखाली प्लेसमेंटचे आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अर्चना जडे व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समितीने केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, एम.सी.ए. व आय.एम.सी.ए. विभागप्रमुख प्रा.मनोज बेहेरे, एम.एम.एस. विभागप्रमुख व आयक्यूएसी समन्वयक डॉ. मनोज पटेल, पदवी विभागप्रमुख डॉ. तुषार पटेल यांनी केले.