राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानावर कोसळलं भलंमोठं झाड

    दिनांक : 24-May-2022
Total Views |
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानावर आज वादळी वाऱ्यामुळे नुकतंच झाड कोसळलं आहे. झाड आकारमानाने भलंमोठं असल्याने त्यांच्या बंगल्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी टळली आहे.
 
 
 tree pic
 
नागपूरात आज दुपारी साडेचार वाजता सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला असून यावेळी देशमुख यांच्या निवासस्थानावर असलेलं झाड थेट अनिल देशमुख आणि रणजित देशमुखांच्या निवास्थानावर कोसळल्यामुळे बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं नुकसान झालं असून भिंतीलाही तडे गेले आहेत.