अंगणवाडी सेविकेचा दुचाकीवरून तोल जावून मृत्यू

    दिनांक : 23-May-2022
Total Views |
नंदुरबार : शिरपूर शहादा रस्त्यावरील टेकवडे फाटा ते भामपूर या दरम्यान दुचाकीवरचा ताबा सुटल्याने तोरखेड्याच्या अंगणवाडी सेविका मनीषा गोपाळ चौधरी वय ४१ रा. तोरखेडा ता. शहादा जि. नंदुरबार यांचा मृत्यू झालेला आहे. ही घटना कळताच कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत त्यांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली. यामुळे तोरखेडा गावात शोककळा पसरली आहे.
 

ledy 
 
मनीषा चौधरी या त्यांचे पती गोपाळ चौधरी सोबत शिरपूर शहादा मार्गे तोरखेडा जायला निघाले होते. टेकवाडे ते भामपूर फाट्यादरम्यान भरीत सेंटर जवळ डुलकी आल्याच्या कारणास्तव दुचाकीवरील तोल जावून त्या खाली पडल्या. डोक्यास जबर मार बसल्याने त्यांच्या पतींनी त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात भरती केल्यावर तपासादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.