पाथर्डीच्या आरती केदारची महिला IPL मध्ये निवड

    दिनांक : 18-May-2022
Total Views |
अहमदनगर : बीसीसीआयने (Bcci) 16 मे ला महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेसाठी (women t20 challenge) टीमची घोषणा केली. महिला चॅलेंज स्पर्धेसाठी अहमदनगरच्या आरती केदार (Aarti Sharad Kedar) या तरुणीची निवड करण्यात आली आहे. महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेसाठी प्रत्येक टीममध्ये 16 खेळाडू असणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन हे 23 ते 28 मे दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
 
 

aarati 
 
 
  
आरतीची BCCI कडून IPL स्पर्धेतील व्हेलॉसिटी संघात निवड करण्यात आली आहे. आरतीच्या या निवडीचा पाथर्डी सह नगर जिल्ह्यातून कौतुक होत आहे. आरती ही शेतकऱ्याची मुलगी असून पाथर्डी सारख्या छोट्याशा गावात महिला क्रिकेटसाठी कोणतही वातावरण नसताना आरतीने प्रतिकूल परिस्थितीत परिश्रम घेत हे यश मिळवल आहॆ. 
 
आरती पाथर्डीच्या हातरळ गावातील पदवी शिक्षण घेतेय. आरती 2014 पासून क्रिकेटकडे वळली. तेव्हापासून आरतीने पाथर्डीत सराव करत महाराष्ट्र टीममध्ये आपलं स्थान निश्चित केल.
 
आरती लेफ्ट आर्म स्पिनर आहे. आरतीने नुकतंच पोंडीचेरीत झालेल्या महिला रणजी सामन्यात सर्वधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. आरतीने याच कामगिरीच्या जोरावर महिला आयपीएलमध्ये धडक मारली.
 
वूमन्स आयपीएलबाबत थोडक्यात
 
महिला स्पर्धेत ट्रेलब्लेजर्स, व्हेलोलसिटी आणि सुपरनोव्हाज अशा 3 टीम खेळतात. सुपरनोव्हाजने सलग 2018 आणि 2019 मध्येविजेतेपद पटकावलं होतं. यानंतर ट्रेलब्लेजर्सने पहिल्यांदा 2020 मध्ये विजेतपद पटकावलं. मात्र यानंतर 2021 मध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारी म्हणून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नाही.
 
महिला टी 20 चॅलेंज 2022 साठी तिन्ही संघ
 
सुपरनोव्हाज : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), तानिया भाटिया, एलाना किंग, आयुषी सोनी, चंदू वी, डिएंड्रा डॉटिन, हरलीन देओल, मेघना सिंह, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्राकर, प्रिया पुनिया, राशि कनौजिया, सोफी एक्लेस्टोन, सुने लुस आणि मानसी जोशी.
 
ट्रेलब्लॅझर्श : स्मृती मंधाना (कर्णधार), पूनम यादव, अरुंधति रेड्डी, हॅली मैथ्यूज, जेम्मिाह रोड्रिग्स, प्रियंका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह, ऋचा घोष, एस मेघना, सैका इशाक, सलमा खातून, शर्मिन अख्तर, सोफिया ब्राउन, सुजाता मलिक आणि एसबी पोखरकर.
 
व्हेलॉसिटी : दीप्ती शर्मा (कॅप्टन), स्नेह राणा, शैफाली वर्मा, अयाबोंगा खाका, केपी नवगीर, कॅथरीन क्रॉस, कीर्ती जेम्स, लौरा वोल्वार्ड्ट, माया सोनवणे, नत्थाकन चंतम, राधा यादव, आरती केदार, शिवली शिंदे, सिमरन बहादुर, यास्तिका भाटिया आणि प्रणवी चंद्रा.
 
सामन्याचं वेळापत्रक
 
23 मे- संध्याकाळी 7:30 वाजता – ट्रेलब्लॅझर्श विरुद्ध सुपरनोवाज
24 मे- दुपारी 3:30 वाजता – सुपरनोवाज विरुद्ध व्हेलॉसिटी
26 मे- संध्याकाली 7:30 वाजता – व्हेलॉसिटी विरुद्ध ट्रेलब्लॅझर्श
28 मे- संध्याकाळी 7:30 वाजता – अंतिम सामना