धक्कादायक.... त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठात ५० कोटींचा अपहार?

    दिनांक : 16-May-2022
Total Views |
 
 
नाशिक: नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ (Shri swami samarth) गुरुपीठात ५० कोटींचा अपहार झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. गुरुपीठाच्या संचालकां विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. २००९ ते २०२१ या काळात त्र्यंबकेश्वरच्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठ या धर्मादाय संस्थेचा दुरुपयोग करून ५० कोटींचा अपहार केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. धुळ्याच्या स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी अमर पाटील यांनी तक्रार केली आहे. अण्णासाहेब मोरे यांच्यावर फौजदारी कारवाई मागणी तक्रारदार अमर पाटील यांनी केली आहे.
 



gurupith2 
 
 
 
नक्की प्रकरण काय?
 
निविदा न काढता कामांवर खर्च केल्याचा ठपका संचालकावंर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी गुरुपीठाच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे. याबाबत धर्मादाय आयुक्तांचा अहवाल येणार आहे. हा अहवाल आल्यानंर पुढील योग्य की कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आल आहे. 
 
धर्मदाय संस्थेत धर्मदाय संस्थेचा निधी हा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणे कायद्याने बंधनकारक असतं. तसंच सर्व कार्यकारी मंडळाचे आणि विश्वस्तांचे कर्तव्य असते. पण आरोपी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगमताने फौजदारी स्वरूपाचे कटकारस्थान आणि फसवणूक करून मोठ्या प्रमाणावर खालील नमूद केल्या प्रमाणे संस्थेचा निधी राष्ट्रीय बँकत न ठेवता स्वतःच्या हातात ठेवला आणि संस्थेच्या निधीचा अपहार केला, असा आरोपही करण्यात येत आहे.
 
धर्मादाय आयुक्तांकडून यासंदर्भातला अहवाल आल्यानंतर त्यातील तथ्य तपासून पुढील कारवाई करू असे पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले आहेत. तक्रारदारांनी आर्थिक स्वार्थापोटी खोटे आरोप केल्याचा दावा स्वामी समर्थ गुरुपीठच्या चंद्रकांत मोरेंनी केला आहे. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ केंद्रानेल हे सर्व आरोप फेटाळले आहेत.