मनसेतील अंर्तगत कलह झाला अधिक तीव्र

    दिनांक : 15-May-2022
Total Views |
पुणे : शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीमधून मनसे नेते वसंत मोरे यांचे नाव वगळण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 
 vm
 
 
वसंत मोरे कोअर कमिटीचे सदस्य असतांनाही नाव वगळले गेले आहे. पक्षातील काही स्थानिक नेते हे कट कारस्थान करत असल्याचा त्यांनी केला आहे. नाव वागल्याचे कळताच वसंत मोरे यांनी तात्काळ पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केली असून स्थानिक नेत्यांनी मुद्दाम नाव वगळले असल्याचा असा आरोपही त्यांनी केला आहे.