धुळे : मोरशेवडी येथे विहरीचा भाग कोसळून आईसह १० वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न सुरु असून घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे. ढिगाऱ्याखाली अडकून गुदमरून दोघांचा मृत्यू झाला.
सुनीता पवार आणि शाम पवार अशी मृत मे लेकांची नावे आहेत. ते नांदगाव तालुक्याचे रहिवासी आहेत. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. विहीर बघण्यासाठी दोघे मायलेक गेले होते. दिलीप खीरा जाधव यांच्या विहरीचे काम सुरू असतांना ही घटना घडून आली आहे.