न्यू फिचर्स सोबत व्हाट्सअँप होणार सज्ज

    दिनांक : 12-Apr-2022
Total Views |

‘सध्या व्हाट्सअँप न्यू फिचरवर काम करीत आहे. लवकरच आपल्या अ‍ॅपमधील सर्व युजर्ससाठी नवं फिचर उपलब्ध केले जाऊ शकते. सध्या iOS बीटा बिल्ड नवीन ड्रॉईंग टूल वैशिष्ट्यासह येतं. यामुळे iOS वर फोटो (Image) बदलण्यात मदत करते. WaBetaInfo ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म एक नवीन वैशिष्ट्य सादर करण्याची योजना आखत आहे जे त्याच्या वापरकर्ता (WhatsApp User) बेससाठी अधिक सुलभ पर्याय उपलब्ध करून देतील. सदयसिस्थीत हे नवीन फिचर केवळ iOS बीटा बिल्ड आवृत्ती 22.8.0.73 वर उपलब्ध होऊ शकेल. परंतु, कुठल्याही स्मार्टफोनवर इमेज पाठविल्यास, त्या यूजर्सला पाहता येतील. व्हॉट्सअ‍ॅप ऍप्लिकेशन आधीच ड्रॉइंग टूल्स drawing tools ऑफर करते, परंतु नवीन अपडेट वापरकर्त्यांना ऑफर केलेल्या टूल्सवर अधिक आकर्षक पर्याय दिसतील.

 
 
 
whatsapp 
 
 
 

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने ड्रॉईंग टूल्सचा हा नवीन संच वापरकर्त्यांना इमेजवर लिहिण्याची किंवा त्यांना आवश्यक नोट्स आणि भाष्यांसह संपादित करण्यास अनुमती देईल. पूर्वी, युजर्सला ड्रॉइंग पर्यायासाठी फक्त एक पेन्सिलचा पर्याय दिसत होता. पण आता, WaBetaInfo ने शेअर केलेले नवीन स्क्रीनशॉट पेन्सिलसाठी तीन नवीन गेज तसेच नवीन सेटमध्ये नवीन ब्लर टूल पर्यायही असतील.

 

ही वैशिष्ट्ये लवकरच बीटा बिल्डच्या Android आवृत्तीवर देखील येऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपला एक नवीन मीडिया व्हिजिबिलीटी फिचरही मिळत आहे. यामुळे चॅट बंद झाल्यावर तुमच्या डिव्हाइसवर मीडिया आपोआप सेव्ह करण्याची पद्धत बदलेल. नवीन फिचरमुळे चॅट गायब होण्यासाठी तुमच्या फोनच्या गॅलरीत मीडिया ऑटो सेव्ह करणं थांबेल. WhatsApp अनावश्यक चॅटसाठी स्वयंचलित मिडिया व्हिजीबिलिटी बंद करतंय.

 

Media visibility वैशिष्ट्य

 

युजर्सना त्यांच्या डिव्हाइसच्या गॅलरीत मीडिया पाहण्याची परवानगी देते. हे अपडेट iOS वर WhatsApp साठी देखील येऊ शकते. गायब झालेल्या चॅटमध्ये तुम्ही अजूनही मीडिया मॅन्युअली सेव्ह करू शकता, असंही सांगितलं जातंय. WhatsApp ने नुकतेच एक नवीन फीचर लाँच केले आहे, जे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह न केलेल्या नंबरवर मेसेज पाठवणे सोपे करते.

 

यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवरील नंबरवर क्लिक केल्यास फोनचे डायलर अ‍ॅप उघडण्याची सुविधा उपलब्ध होती. नवीन फीचर आता वापरकर्त्यांना चॅटमधील नंबरवर क्लिक केल्यावर, मेसेज पाठवताना, डायल किंवा सेव्ह करताना तीन पर्याय देते.