याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रमोद अत्तरदे बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, अरुण बोरोले, चंद्रकांत बेंडाळे, किशोर ढाके, डॉ.मिलींद पाटील, नितीन इंगळे, लिलाधर चौधरी, निला चौधरी, निता वराडे, पुजा भंगाळे, प्रा.डॉ.सुनिता चौधरी, भास्कर बोरोले, शिरीष भंगाळे, डॉ.आर.बी.वाघुळदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते. कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीपूजन व दिपप्रज्वलन करुन झाली.
याप्रसंगी अमेरिकेतील क्रिप्टो असेट कंपनीचे सीईओ प्रमोद अत्तरदे यांनी त्याच्या व्याख्यानात विविध विषयांवर प्रकाश टाकत उदाहरणासहीत मुद्देसुदपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. टेक्नॉलॉजी अॅडव्हान्समेंट बद्दल सांगतांना बायोमेडिकल सायन्स, जेनेटिक सायन्स, डिजीटल इमॉर्टल तसेच मेंदूशी संबंधित संज्ञा विस्तृतपणे स्पष्ट केल्या. त्याचप्रमाणे भारतातील स्टार्टटप बद्दल बोलतांना ब्लॉकचेन ही संकल्पना कशी वृद्धींगत होत आहे तसेच भारत सरकारने ब्लॉकचेन संदर्भात सुरु केलेल्या सर्टिफाईड कोर्सची माहिती दिली.
विद्यार्थ्यांचा किमान १० वर्षाचा रोडमॅप असायला हवा, संवाद कौशल्य, गुण कौशल्ये, स्वत:ची प्रोडक्टव्हिटी, वेगवेगळ्या संधी या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच प्राईज व व्हॅल्यूचे समीकरण सांगितले व सांगकामे न होता स्वत:च्या गरजा ओळखून काम करण्यावर भर द्या असेही आवाहन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही अत्तरदेंनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.हर्षल चौधरी, प्रा.सुरभी नेमाडे यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी करत विद्यार्थ्यांना परदेशातील सुवर्णसंधीचा मागोवा घेत उज्ज्वल करियरसाठी शुभेच्छा दिल्यात.