संघ स्वयंसेवक ते मुख्यमंत्री असा हा Shivraj Singh Chouhan शिवराजसिंह चौहान यांचा थक्क करणारा प्रवास आहे.मध्यप्रदेशसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा सफाया करून राज्यात सत्ता हस्तगत करणे हे 2005 साली सहज सोपं काम नव्हतं. बाबुलाल गौर यांच्यानंतर 29 नोव्हेंबर 2005 रोजी सर्वप्रथम शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळली. आज ते मध्यप्रदेशचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविणारे भाजपा नेते ठरले आहेत.
29 नोव्हेंबर 2005 ते 12 डिसेंबर 2008 असा त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ होता. त्यानंतर 12 डिसेंबर 2008 ते 12 डिसेंबर 2018 असे सलग 10 वर्षं चौहान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. म्हणजेच, मुख्यमंत्रिपदाचे पाच वर्षांचे सलग दोन कार्यकाळ त्यांनी त्यावेळी पूर्ण केले. शिवराजसिंह चौहान यांचा मुख्यमंत्रिपदाचा चौथा कार्यकाळ 23 मार्च 2020 पासून सुरू झाला. त्यामुळे भाजपातर्फे सर्वाधिक काळ 15 वर्षे 15 दिवस मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे आणि पुढेही राहणार आहे. याव्यतिरिक्त मध्यप्रदेशचे मु'यमंत्रिपद चार वेळा भूषविणारे नेते म्हणूनही चौहान यांच्या नावाची नोंद आहे. या आधी हे भाग्य मध्यप्रदेशातील अन्य कोणत्याच नेत्याला लाभले नाही.
चौहान Shivraj Singh Chouhan यांचा हा विक्रम यापुढे कोणताही नेता मोडू शकेल, याचीही शक्यता नाही. शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशात अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कन्यादान योजना, लाडली लक्ष्मी योजना, ग्रामीण सडक योजना, अन्नपूर्णा योजना, युवा स्वरोजगार योजना, नि:शुल्क पॅथॉलॉजी परीक्षण योजना, मजूर सुरक्षा योजना व ज्यांच्या जवळ स्वतःच्या मालकीची जागा नाही, अशा गरीब लोकांना घर बांधण्यासाठी भूखंड देण्याची योजनाही त्यांनी आपल्या राज्यात राबविली.
अशा अनेक लोकोपयोगी योजनांमुळे मध्यप्रदेशात चौहान Shivraj Singh Chouhan एक सक्षम मु'यमंत्री म्हणून उदयास आले आहेत. एका सामान्य कार्यकर्त्याचे अथक परिश्रम, संघटन कौशल्य व जनतेप्रती असलेला आदर्श त्यांच्या मुख्यमंत्रिपदात सामावलेला आहे. सरकारी योजनांचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचेल, हेच त्यांचे अंतिम ध्येय राहिले आहे. राजकीय क्षेत्रात कोणीही गॉडफादर नसताना त्यांनी सामान्य जनतेच्या विश्वासावर आपलं साम्राज्य उभं केलं. हे त्यांच्या अथक परिश्रमाचं श्रेय आहे. राज्यातली सामान्य जनता व गोरगरीबच नव्हे, तर घराघरांमध्ये त्यांना प्रेमाने 'मामा' म्हणून हाक मारली जाते. मध्यप्रदेशात काँग्रेसच्या एकाही नेत्याला हे भाग्य लाभलेले नाही.
'हम करे सो कायदा' या हेकेखोर वृत्तीने पछाडलेली काँग्रेस आज मध्यप्रदेशात शेवटच्या घटका मोजत आहे. काँग्रेसला लागलेला घराणेशाहीचा रोग अजूनही दुरुस्त झालेला नाही. त्यास औषध असूनही हा रोग दुरुस्त करण्याची त्यांची मानसिकता नाही. या उलट मध्यप्रदेशात भाजपा तळागाळातील लोकांचा पक्ष झाला आहे. सामान्य व गोरगरीब जनतेच्या आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करणारा पक्ष म्हणून मध्यप्रदेशात भाजपाने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. हे श्रेय आहे, मुख्यमंत्री Shivraj Singh Chouhan शिवराजसिंह चौहान यांच्या परिश्रमाचे व कार्यकुशलतेचे. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांनी राज्याचे 'मामा' म्हणून यथार्थ नाते निभावले आहे.