मंगळ बाधा, दोष निर्मुलनासाठी अमळनेरला विनामूल्य सामूहिक अभिषेक पूजन

नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजातर्फे विधायक उपक्रम

    दिनांक : 20-Mar-2022
Total Views |
नंदुरबार : सध्याच्या धावपळीच्या युगात वेळेअभावी शक्य न होणार्‍या सामाजिक कार्याचा विडा नंदुरबार येथील सतीश प्रभाकर वानखेडे यांनी उचलला आहे. या नामीसंधीचा फायदा सुवर्णकार समाजबांधवांनी अवश्य घेण्याचे आवाहन नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजातर्फे करण्यात आले आहे.
 
mangalagrah
 
घर परिवार तसेच कुटुंबात किंवा आपल्या नाते संबंधात कोणी मंगळ बाधित मुलगा व मुलगी असेल त्यांची मंगळ ग्रहशांती व अभिषेक, जग प्रसिद्ध अशा अमळनेर येथील मंगळ ग्रह महाराज मंदिरात सामुहिकरित्या विनामुल्य करून घेण्याचे प्रयत्न असून याबाबत नियोजन सुरू आहे. यानिमित्ताने जी मंगळ बाधित मुले मुली, थोडे दुर्लक्षित व उपेक्षित राहून गेले आहेत. त्यामुळे त्यांचे पालकही चिंताग्रस्त आहेत.
 
 
अशा सर्वांना एकाच ठिकाणी आणुन त्यांची मंगळशांती पूजा व आपसात ओळख परिचय घडवुन आणावा असा नम्र उद्देश नंदुरबार सोनार समाज कार्यकारिणी साकारत आहेत. कार्यक्रमाच्या दिवशी चहा, नाश्ता व दुपारच्या जेवणाची व्यवस्था विनामुल्य ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यासह परजिल्ह्यातील लांबच्या ठिकाणाहून येणार्‍या भाविकासाठी रात्रीचा मुक्काम व भोजनाची व्यवस्था देखील विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
यासाठी एक लिंक असून त्या मार्फत मंगळ बाधित मुलांनी स्वतःचा फॉर्म भरून संयोजकाकडे पाठवायचा आहे. पूजेची ता. २५ एप्रिल २०२२ सोमवार वेळ सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सतीश प्रभाकर वानखेडे (८३२९०७५१९५), या क्रमांकावर संवाद साधण्याचे आवाहन नंदुरबार अहिर सुवर्णकार समाज यांच्यातर्फे करण्यात आले आहे.