आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार गडगडला

    दिनांक : 07-Feb-2022
Total Views |
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची घसरगुंडी चालूच आहे. आज शेअर बाजार बंद होताना १०३० अंकांनी घसरून ५७,६२१.१९कांवर स्थिरावला. निफ्टीही ३०२ अंकांनी घसरून १७,२१३.६० अंकांवर स्थिरावला आहे. आज १३८९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर २०४४ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. १३१ कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. आज सकाळपासूनच शेअर्समध्ये घसरण चालूच होती. मधला थोडा काळ सेन्सेक्स सावरला पण नंतर परत घसरण चालूच राहिली.

Business 
 
सार्वजनिक बँका, मेटल आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. आयटी, फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्स घसरले. निफ्टीमध्येही घसरण चालूच आहे, टाटा कंज्यूमर प्रॉडक्ट्स, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाईफ, एल अँड टी आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. पॉवर ग्रीड कॉर्प, ओएनजीसी, एनटीपीसी, श्री सिमेंट्स, टाटा स्टील या कंपन्यांचे निफ्टीमध्ये वाढ झालेली दिसून आली.