संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनच्या शिबिरात १७१ जणांनी केले रक्तदान

    दिनांक : 21-Feb-2022
Total Views |
नंदुरबार : संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन दिल्ली, शाखा नंदुरबार मार्फत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १७१ रक्तदात्यांनी केले. रक्तदान तसेच नंदुरबार शाखेमार्फत गेल्या सहा वर्षात एक हजार व्यक्तींनी केले रक्तदान संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन दिल्ली, शाखा नंदुरबार मार्फत परमपूज्य सद्गुरु माता सदिक्षा सविंदर हरदेव महाराज यांच्या आशीर्वादाने सिंधी कॉलनी परिसरातील संत निरंकारी भवन येथे रविवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जि.प.उपाध्यक्ष राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
 
ndb 
 
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे विभागाचे प्रमुख हिरालाल पाटील होते. कार्यक्रमाला मोहन आहुजा, गणेश पाटील, डॉ.अनिल कानडे, विनोद लोधी, नगरसेवक राकेश हासानी, परवेज खान ,अतुल पाटील, चंदर मंगलानी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.नंदुरबार येथील मंडळातर्फे गेल्या सहा वर्षात एक हजार जणांनी रक्तदान आत्तापर्यंत केले आहे देशभरात रक्तदान शिबीरामार्फत सुमारे १२ लाख ५० हजार जणांनी रक्तदान करून सहकार्य केले आहे. मंडळामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असतात त्यात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण हे उपक्रम राबविण्यात येत असतात अशी माहिती मंडळाचे मोहन आहुजा यांनी दिली.