अजिंक्य रहाणेचं रणजी करंडक स्पर्धेत दमदार शतक

    दिनांक : 17-Feb-2022
Total Views |
मुंबई: मुंबईकर अजिंक्य रहाणेने रणजी करंडक स्पर्धेत दमदार शतक झळकावलं आहे. आजपासून रणजी सीजनला सुरुवात झाली आहे. सौराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने शतकाला गवसणी घातली. अजिंक्य रहाणेचं प्रथमश्रेणीमधील हे 36 व शतक आहे. त्याने 212 चेंडूत शतक पूर्ण केलं. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर मुंबई विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामना सुरु आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि सौराष्ट्रामधल्या या रणजी लढतीकडे देशभरातल्या मीडियाचे लक्ष आहे. कारण या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे खेळत आहेत. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या या दोघांचा आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात समावेश होण्याची शक्यता कमी आहे. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दोघांना हरवलेला सूर शोधण्यासाठी रणजी कंरडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता. रणजी मध्ये दमदार प्रदर्शन केल्यास निवड समितीकडून त्यांचा विचार होऊ शकतो.
 

rahane 
 
सरफराझनेही झळकवल शतक
डावखुरा फिरकी गोलंदाज धर्मांद्रासिंह जाडेजाच्या गोलंदाजीवर षटकार ठोकून रहाणे 99 धावांवर पोहोचला. एक धाव काढून त्याने शतक पूर्ण केलं. रहाणेला मैदानात सरफराझ खानने साथ दिली. इथे फलंदाजी करणं सोप नव्हतं. पण रहाणेने आपल्या सर्व अनुभवाचा वापर करुन सौराष्ट्राच्या गोलंदाजांचा सामना केला. रहाणेने त्याच्या खेळीत 14 चौकार आणि दोन षटकार लगावले. सरफराझसोबत 150 धावांची भागीदारी केली. सरफराझने सुद्धा 191 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याने दोन षटकार आणि 11 चौकार लगावले.