मुंबई : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात अतिशय नकारात्मक झाली. शेअर बाजार जवळपास 1500 अंकांच्या घसरणीसह सुरू झाला. जागतिक शेअर बाजारातही घसरण असल्याचे दिसून आले.
तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक म्हणजेच निफ्टीमध्ये 400 हून अधिका अंकाची घसरण झाली. तसेच शिपिंग घोटाळ्याचा परिणाम बँक निफ्टीवर होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय जागतिक शेअर बाजारामध्येही घसरण दिसून आली आहे. SGX हा 1.5 टक्क्यांनी घसरला आहे. सकाळी 9.17 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 1231.66 अंकांची म्हणजे 2.12 टक्क्यांनी घसरण झाली. तर, निफ्टी 298.60 अंक म्हणजे जवळपास 1.72 टक्क्यांनी घसरण झाली. अमेरिकेतील महागाई, युक्रेन तणावासह अनिल अंबानी यांच्यासह इतर चार जणांवर सेबीने शेअर बाजारात व्यवहार करण्यास केलेल्या मनाईचाही परिणाम बाजारातील व्यवहारावर होऊ शकतो. जगातील महत्वाच्या शेअर बाजारांमध्येही घसरण नोंदवण्यात आली होती. त्यामुळे भारतीय बाजारांमध्येही गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला.