मुंबई : मार्च आणि एप्रिलमध्ये खेळल्या जाणार्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या हंगामासाठीचा मेगा लिलाव (Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू इथे सुरु आहे. या लिलावात 590 खेळाडूंवर बोली लावली जाणार असून त्यात 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र या ऑक्शनपूर्वी 2 टीमचे कर्णधार दुखापतग्रस्त असल्याचं समोर आलं आहे.
गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. आयपीएलच्या शेवटच्या सिझनमध्ये त्याला गोलंदाजीही करता आली नव्हती. याशिवाय त्याने रणजी स्पर्धेत खेळण्यासही नकार दिला होता. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आयपीएलच्या 15वा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी पंड्या फिटनेसवर काम करण्यात व्यस्त आहे.
दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसच्या हाताच्या कोपरावर शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या केनचं रिहॅबिलीटेशन सुरु आहे. आयपीएलपूर्वी नेदरलँडविरुद्ध होणाऱ्या मालिकेपर्यंत तंदुरुस्त राहण्याची आशा त्याने व्यक्त केलीआहे . गेल्या सिझनमध्ये त्याला डेव्हिड वॉर्नरच्या जागी कर्णधार बनवण्यात आलं होतं.
केकेआर आणि पंजाब किंग्ज नव्या कर्णधाराच्या शोधात
दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) टीम देखील नवीन कर्णधाराच्या शोधात आहेत. केकेआरसाठी गेल्या मोसमात, इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन आणि केएल राहुलने पंजाबचं नेतृत्व केलं होतं. केकेआरने मॉर्गनला रिटेन केलं नाही. तर केएल राहुल पंजाब सोडून लखनऊच्या टीममध्ये सामील झाला.
आरसीबीही नव्या कर्णधाराच्या शोधात
विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूदेखील दमदार कर्णधाराच्या शोधात आहे. आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलला रिटेन केलं आहे त्यामुळे फ्रेंचायझी त्याला कर्णधारपद देणार असल्याची चर्चा आहे. तर सूत्रांच्या माहितीवनुसार, RCB मेगा लिलावात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर किंवा श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून खरेदी करू शकते.