आरोग्य खाते पेपर घोटाळा ; मुख्य म्होरक्या गजाआड

    दिनांक : 10-Feb-2022
Total Views |
पुणे : राज्यात गाजत असलेल्या आरोग्य भरती पेपर फुटीतील पुणे सायबर पोलीसांना पाहिजे असलेला आणखी एक म्होरक्या सायबर पोलीसांच्या हाती लागला आहे. अतुल प्रभाकर राख (रा.थेरला ह.मु. अंकुशनगर कपिल मुनी मंदिराच्या पाठीमागे ) असे आज अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

rakh1
 
आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. या प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना पाहिजे असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याच्या सर्व अ‍ॅक्टीव्हीटी अतुल राख करत होता. तसेच, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संजय सानप याचा अतुल राख हा मेहुणा आहे.
अतुल राख याला पोलिसांनी पुण्यातूनच जेरबंद केलं आहे. पेपरफुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिस वडझरीच्या दोन्ही सानप बंधूचा तपस करत आहेत. त्यापैकी संजय सानप याला अटक करण्यात आली आहे. तर, जीवन सानप हा अजून फरार आहे.
अतुल राख याला अटक करण्यात आल्याने इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत. अटक करण्यात आलेल्या अतुलला आज कोर्टात हजर करणार आहेत.