केपटाऊन : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत तीन सामन्यांची कसोटी सीरीज खेळत असून 2 सामन्यांनंतर ही सीरीज सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. सीरीज बरोबरीत असल्यामुळे तिसरी कसोटी निर्णायक ठरणार आहे. तिसरी कसोटी भारत जिंकल्यास मोठा इतिहास घडणार आहे.
आफ्रिकन भूमीवर भारताने अजून एकदाही टेस्ट सीरीज जिंकलेली नाही. त्यामुळे टीम इंडिया शेवटचा सामना जिंकण्याचा पूरेपूर प्रयत्न करणार आहे. मात्र तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा एक घातक खेळाडू संघाबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे.
टीम इंडियाला मोठा झटका
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हाताच्या दुखण्यामुळे केपटाऊनमध्ये होणाऱ्या कसोटीत खेळण्या शक्यता कमी आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दुसऱ्या कसोटीनंतर सांगितलं की, सिराज पूर्णपणे फीट नाहीये. दुसऱ्या सामन्यात हाताच्या दुखण्यामुळे सिराजने संपूर्ण सामन्यात केवळ 15.5 ओव्हर टाकल्या. दुसऱ्या डावात त्याला केवळ 6 ओव्हरंच टाकता आल्या.
सिराजने तिसरी कसोटी खेळणं गरजेचं
तिसर्या कसोटीत मोहम्मद सिराज टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा गोलंदाज ठरू शकतो. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसोबत सिराजची जोडी खूपच चांगली आहे. या तिन्ही गोलंदाजांनी टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिलेत. त्यामुळे सिराजला न खेळवल्यास टीम इंडियासाठी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.
येत्या चार दिवसांत तो फीट आहे की की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. स्कॅन केल्यानंतर फिजिओ सिराजच्या बाबतीत नेमकी स्थिती सांगू शकतील, असंही राहुल द्रविड यांनी सांगितलं आहे.
दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावातही सिराज पूर्णपणे फीट नव्हता. आमच्याकडे पाचवा गोलंदाज होता आणि मात्र आम्ही त्याचा गरजेचा आहे तसा वापर केला नाही. मात्र त्यामुळे आमच्या रणनीतीवर परिणाम झाला, असंही द्रविड यांनी सांगितलं.
मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला होता. मात्र टीम इंडियाला दुसरी टेस्ट जिंकता आली नाही आणि 7 विकेट्सने भारताने गमावली, त्यामुळे तिसऱ्या टेस्टकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं आहे.