आयपीएलचे १५ वे पर्व मुंबईतच होणार !

तीन स्टेडियम्सवर सामने खेळवणार

    दिनांक : 29-Jan-2022
Total Views |
मुंबई : अखेर आयपीएल २०२२चे आयोजन हे मुंबई आणि आसपासच्या स्टेडीयमवर आयोजित केले जाणार हे निश्चित झाले आहे. या संदर्भात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली असल्याचे सांगण्यात येत आहे. २० फेब्रुवारीला याबाबतची अधिकृत घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल २०२२ला मार्चच्या अखेरच्या आठवड्यात सुरुवात होणार आहे.
 
IPL
 
२७ मार्चपासून ही स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे. देशातील कोरोना परिस्थिती पाहता आयपीएलचे सामने एकाच शहरात किंवा राज्यात खेळवण्याचा विचार आहे. मात्र, विनाप्रेक्षक हे सामने खेळवले जाणार आहेत. त्यासाठी बीसीसीआयने मुंबईची निवड केली आहे. वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डी व्हाय पाटील स्टेडियम या स्टेडीयमवर सामने आयोजित केले जाऊ शकतात. गरज पडली तर पुण्यातील गहुंजे स्टेडियमवरही काही सामने खेळवले जाऊ शकतात.