कोरोना वडा : 2019मध्ये कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर आख्या जगाचा संपूर्ण जीवनच बदलून गेलं. दोन वर्षांनंतरही या साथीच्या आजारानं सर्वांनाच ग्रासलं आहे. पण मानवानं त्याचा जगणं सोडलं नाही त्याला कितीही संकट आलीत तरी तो त्यांना धैर्यानं समोर गेला आणि जात आहे अशातही काहीजण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतातच. काहींनी सर्जनशील पद्धतीनं अन्नपदार्थांचे प्रयोग केले आणि तेव्हापासून हे प्रकार काही थांबण्याचं नावच घेत नाहीत. असाच काहीसा प्रकार अलीकडच्या काळात सोशल मीडियावर घडला आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल कोणाचं डोकं कसं चालेल, हे सांगता येणार नाही.
कोरोना संदेश स्वीट मिठाई
2020मध्ये कोलकाता येथील एका दुकानदारानं कोरोना संदेश स्वीट नावाची मिठाई बनवली होती, जी पाहून सोशल मीडियावरचे यूझर्स थक्क झाले होते. आता असाच एक पराक्रम एका महिलेनं केला. यामध्ये तिनं कोरोनासारखा दिसणारा वडा बनवला आहे.
साहित्य :
तांदळाच पीठ , कांदा, टोमाटॊ, हिरवी मिरची, लसूण , मीठ ,कोथांबीर ,उकडलेले बटाटे
कृती :
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिला तांदळाचं पीठ मळून घेते आणि नंतर कांदा-टोमॅटो घालून बटाट्याचं सारण तयार करते. यानंतर हे सारण पिठाच्या आत भरून ती महिला कच्च्या तांदळानं ते कोट करते आणि वाफेवर चांगलं शिजवते आणि नंतर पाण्यात भिजवलेल्या तांदळानं गुंडाळते. आता जे काही तयार झालं, ते अगदी कोरोना विषाणूच्या स्पाइक्ससारखं दिसतं..
ट्विटरवर शेअर
Twitterवर Mimpi नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शन लिहिलंय, की कोरोना वड़ा, भारत की नारी सब पर भारी.’ याला पाच हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेक यूझर्सनी त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.