शिरपूर : धुळे नंदुरबार विधानपरिषदेचे आ.माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचा मुंबई विधानभवन येथे शपथविधी समारंभ झाला. धुळे नंदुरबार विधानपरिषदेचेमाजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांचा मुंबई मंत्रालय, विधानभवन येथे २० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते शपथविधी समारंभ पार पडला.
यावेळी उपसभापती निलम गोर्हे यांनी आ.अमरिशभाई पटेल यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच उपस्थित अनेक मान्यवरांनी आ. अमरिशभाई पटेल यांचा सत्कार केला. माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल हे धुळे व नंदुरबार विधान परिषदेवर शुक्रवारी २६ नोव्हेंबर रोजी बिनविरोध निवडून आले. पटेल हे शिरपूर तालुक्यातून विधानसभेवर सलग चार वेळेस त्यानंतर धुळे व नंदुरबार जिल्हा विधानपरिषदेवर पोटनिवडणूकसह सलग चौथ्यांदा असे सलग आठव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात अष्टपैलू व्यक्तिमत्व, विकासाची दूरदृष्टी असलेले नेते म्हणून आ.अमरिशभाई पटेल यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी गेल्या ३५ वर्षाच्या राजकीय जीवनात सर्वच पक्षातील दिग्गज नेते व कार्यकर्ते यांच्याशी स्नेहसंबंध प्रस्थापित करून सर्वांना विकासाची दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विकासकामांच्या अजेंड्यावर प्रभावित होऊन आ.पटेल यांना बिनविरोध निवडून देण्यात आले आहे.