धुळे : महापालिकेच्या बोगस लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणात मनपा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयातून धुळे शहर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी काही संशयास्पद कागदपत्र हस्तगत केले. यातून या प्रकरणा संदर्भातील काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिस प्रशासनातर्फे वर्तविण्यात येत आहे.
धुळे महापालिकेच्या बोगस लसीकरण प्रमाणपत्र वाटप प्रकरणात पोलिस प्रशासनातर्फे तपासाला वेग आल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे. आज धुळे शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेल्या आरोग्य अधिकारी महेश मोरे यांच्या कार्यालयाची झडती घेत. तेथून कागदपत्र हस्तगत केले.