क्रिकेट प्रेमींसाठी मोठी बातमी : विराट कोहलीने सोडले कर्णधारपद!

    दिनांक : 15-Jan-2022
Total Views |
नवी दिल्ली : क्रिकेट प्रेमी आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. विराट कोहली याने सोशल मीडियावर पोस्ट करत कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते आणि क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीने आगामी 2021 टी-20 वर्ल्ड कपनंतर टी- 20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले आहे.


Virat 1
 
विराट कोहलीने ट्विटरवर एक पत्र शेअर करत कॅप्टन पद सोडत असल्याचे जाहीर केले आहे. त्याने या पोस्टमध्ये भावुक होत आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. त्याने ही पोस्ट करत इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन म्हणून केलेल्या वाटचालीत मला ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचे आभार मानत असल्याचे लिहिले आहे. विराटने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘T20, वन डे आणि टेस्ट क्रिकेट या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये गेली 8-9 वर्षं मी सातत्याने खेळत आहे. त्यातली 5-6 वर्ष तिन्ही फॉरमॅटचा मी कॅप्टन म्हणून देखील काम केले आहे. या वर्कलोडचा विचार करताना मला स्वतःला थोडी स्पेस देण्याची गरज वाटते. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून ODI आणि टेस्ट क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करण्याच्या दृष्टीने मला स्वतःसाठी थोडा वेळ देण्याची गरज वाटते. म्हणूनच टी 20 वर्ल्ड कप संपल्यानंतर टी-20 टीमचा कॅप्टन म्हणून मी पायउतार होऊ इच्छितो.’
 

 
 
तसंच, ‘टी-20 टीमचा बॅट्समन म्हणून मी भविष्यात खेळत राहणार असल्याचे विराट कोहलीने या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. त्यासोबतच, ‘मी हा निर्णय खूप विचार करून आणि आप्तांशी विचारविनिमय करून घेतला आहे. रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्याशी चर्चा करून मी कॅप्टन पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या कॅप्टनपदाच्या काळात मी टीमला खूप काही दिले आहे. बीसीसीआयचे पदाधिकारी जय शाहा आणि अध्यक्ष सौरव गांगुली यांना देखील माझ्या निर्णयाची कल्पना दिली आहे. मी यापुढेही खेळाडू म्हणून मी टीम इंडियाचा पाठिंबा देत राहीन’, असे विराटने लिहिले आहे