७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्पात नवापूर शहराचा सक्रिय सहभाग

नवापूर येथील जोशाबा सरकार युवा मंडळाचा उपक्रम

    दिनांक : 15-Jan-2022
Total Views |
नवापूर : आयुष मंत्रालय भारत सरकार अंतर्गत सूर्या फाउंडेशन नवी दिल्ली व अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ या संस्थांच्या वतीने कोविड १९ च्या काळात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला व्हिडिओ अपलोड करून लिंक भरण्याचे आवाहन विविध संस्थांमार्फत करण्यात आले.
 
navapur 
 
याप्रसंगी नवापूर येथील योग साधकांनी संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपल्या नातेवाईकांनाकडून तसेच शहरात फिरून २०० साधकांचा रजिस्ट्रेशन करून फेसबुक व युट्युब सारख्या सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्यात आले. या उपक्रमात आरोग्य विषयाची जनजागृती सर्वसामान्य माणसांमध्ये होणे गरजेचे आहे असल्याचे नंदुरबार जिल्ह्याचे इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष नितीनकुमार माळी यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अनंत बिरादार तसेच महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष परमपूज्य शिवानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम झाला. रजिस्ट्रेशन झालेल्या सर्व साधकांना आकर्षक प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.