ट्विटरने नुकतंच रेकॉर्ड स्पेस नावाचं एक नवीन फीचर लॉन्च केलं आहे. तुम्ही जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरच्या स्पेसचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून आता तुम्ही स्पेसला रेकॉर्डसुद्धा करू शकता. तुम्ही जर अॅन्ड्रॉईड (Android) आणि iOS वापरकर्ते असाल तर तुम्ही या नव्या फीचरचा लाभ नक्की घेऊ शकता. या नवीन फीचरबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.
जर तुम्ही स्पेसचा वापर करत असाल आणि या दरम्यान होणाऱ्या चर्चेला रेकॉर्ड करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला स्क्रिनवर "रेकॉर्ड स्पेस" असे बटण दिसेल. या बटणावर क्लिक करून तुम्ही तुमची चर्चा रेकॉर्ड करू शकता. या फीचरचा तुम्ही वापर केल्यानंतर तुमच्या चर्चेची फाईल 30 दिवसांसाठी तुमच्याकडे सेव्ह असेल. तसेच, ट्विटर रेकॉर्डिंगची एक फाईल 120 दिवसांकरिता ट्विटरकडे ती सेव्ह राहिल.
स्पेस बाबत माहिती
ट्विटर स्पेस हा ऑडिओमध्ये संभाषण करण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे. या फीचरद्वारे अनेकजण एकाच वेळी संभाषण करू शकतात. इतर फीचर्सप्रमाणेच सर्वसामान्यांसाठी वापरला जाणारा हा प्लॅटफॉर्म आहे. विशेष म्हणजे स्पेसला ऐकण्यासाठी तुम्हाला ट्विटर अकाऊंटची गरज असलीच पाहिजे याचं बंधन नाही. तुम्ही सरळ त्या स्पेसला जॉईन होऊ शकता. यामध्ये तुम्हाला जे फॉलो करत नाहीत असे लोकसुद्धा सहभाग घेऊ शकतात. एकाच वेळी या फीचरचा लाभ जास्तीत जास्त 13 लोक घेऊ शकतात. त्यामुळे ट्विटर यूजर्स लवकरच या नवीन फीचरचा लाभ घेऊ शकतात.