अ.भा.फार्मासिस्ट असोसिएशनच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी प्रा. सुशिल महाराज पाटील यांची निवड...

    दिनांक : 13-Jan-2022
Total Views |
तळोदा : अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या खान्देश विभागाच्या अध्यक्ष पदी प्रा.सुशील ज्ञानेश्वर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अगोदर प्रा. सुशिल पाटील हे विभागाच्या प्रवक्ता पदावर होते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची प्रवक्ता पदावरून विभागीय अध्यक्ष पदी पदोन्नती करण्यात आली. खान्देश विभागात एकूण जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक अशी प्रमुख चार जिल्ह्यांची जबाबदारी प्रा. सुशिल पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.
 
 
mahajan  
 
फार्मासिस्ट क्षेत्रा मधील फार्मासिस्ट वर होणार अन्याय दूर व्हावा व त्यांना न्याय कसा मिळवता येईल यासाठी त्यांनी खान्देश विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची धडपड चालू होती व कोरोना काळामध्ये सामाजिक बांधिलकी जपत यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. त्यांचे हे कार्य बघून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.पंकज चौधरी, प्रदेश सचिव रोहित वाघ यांच्या शिफारशीनुसार व सर्वांच्या एकमताने निवड करण्यात आली.
 
ही निवड होताच त्यांच्यावर विविध शैक्षणिक,अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. खान्देश विभाग सचिव सतीश पाटील, खान्देश विभाग उपाध्यक्ष भैय्या पाटील यांनी पण त्यांचे कौतुक केले आहे. येणाऱ्या काळामध्ये खान्देश विभागाच्या नाहीतर पूर्ण महाराष्ट्र मध्ये फार्मासिस्टच्या येणार्‍या विविध अडचणी प्रा. सुशील पाटील हे सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पंकज चौधरी व सचिव रोहित वाघ यांनी व्यक्त केला आहे.