वृक्ष संवर्धन समितीने केली 20 रोपांची लागवड
दिनांक : 05-Sep-2021
Total Views |
शिंदखेडा : वृक्ष संवर्धन समितीने वरूळ रोड वरील स्वामी समर्थ केंद्र, विरदेल रोड परिसरात 20 रोपांची लागवड केली असुन तीन वर्षापासुन लागवड करुन झाडांचे संगोपन करण्याचे काम समिती करीत आहे.
यावेळी समितीचे अध्यक्ष योगेश चौधरी, स्वामी समर्थ केंद्रांचे सेवेकरी प्रशांत पाटील, राजेंद्र कौठळकर, डॉ. हितेंद्र पवार, नंदकिशोर पाटील, सागर देसले सर, समितीचे भूषण पवार, राजेंद्र मराठे, जीवन देशमुख, योगेश कुवर, यश मराठे, जसवंत गिरासे उपस्थित होते. यात वड, पिंपळ, निंब, बदाम, पारिजात यांच्या समावेश असून लावलेल्या रोपांचे संवर्धना साठी संरक्षण जाळ्या लावण्यात आल्या. मागील 3 वर्षांपासून वृक्षसंवर्धन समितिच्या वतीने शिंदखेडा शहर व परिसरात शेकडो वृक्षांची लागवड करून संवर्धन केले आहे. तसेच दरवर्षी "मागेल त्याला वृक्ष" मोहिमेअंतर्गत शेकडो वृक्षाचे विनामूल्य वाटत करण्यात येथे. वृक्ष संवर्धन ही काळाची गरज ओळखून शहरातील नागरिकांचा वृक्ष संवर्धन समितीच्या कार्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकान कमीत कमीत एक झाडाची लागवड करून संवर्धन करावे असे आहवान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.