आजपासून भारत, ऑस्ट्रेलिया महिलांचा कसोटी सामना

    दिनांक : 30-Sep-2021
Total Views |
गोल्ड कोस्ट :  15 वर्षांनंतर प्रथमच भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला कि‘केट संघादरम्यान गुरुवारपासून येथील मेट्रिकॉन स्टेडियमवर दिवस-रात्र काळात कसोटी कि‘केट सामना खेळला जाणार आहे. अलिकडेच भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिका 1-2 ने गमावली असली तरी या मालिकेतील लढाऊ कामगिरीमुळे मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र मेट्रिकॉन स्टेडियमच्या खेळपट्टीवर गुलाबी चेंडू कसा वागेल, याबद्दल संघाला फार कमी कल्पना आहे.
 

mahila cricket_1 &nb 
भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान 2006 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात खेळलेल्या मिताली राज व झूलन गोस्वामी विद्यमान संघात आहेत. ऑस्ट्रेलिया संघालासुद्धा नोव्हेंबर 2017 मध्ये एकमेव दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचा मर्यादित अनुभव आहे. मर्यादित सरावासह ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी सामना खेळण्यास मैदानावर उतरणार आहे, परंतु त्यांचे प्रभावी वेगवान गोलंदाज येथील हिरव्या खेळपट्टीवर जबरदस्त कामगिरी बजावण्यास उत्सुक असेल. गुलाबी चेंडूनिशीचा हा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी एक कठीण आव्हान असेल. हा सामना अगदी वेगळा असेल, असे भारतीय संघाच्या माजी कर्णधार व बीसीसीआय सर्वोच्च परिषद सदस्य शांता रंगास्वामी म्हणाल्या.