महिन्याच्या चौथ्या शनिवारी वाहनमुक्त दिन; सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती
शिंदखेडा प्रतिनिधी : माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतुन साकार होत असलेल्या दोंडाईचा येथील नंदुरबार चौफुली ते गर्ल्स हायस्कूल पर्यंत असलेल्या रस्त्याला 'राजपथ' असे नामकरण करण्यात आले असून या रस्त्यावर आज दोंडाईचा शहरातील २५१ जोडप्यांनी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण केले.
यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, नगरपालिका मार्फत पर्यावरण सैनिकांचा सत्कार करण्यात आला. आमदार जयकुमार रावल यांनी विकास निधीचा वापर करून दोडाईचा शहराचा विकास करून गावाचे रूप बदलण्याचा प्रयत्न केला. आमदार रावल यांचा नेतृत्वाखाली शहराचा विकास होत आहे, राजपथ वर अब्दुल हमीद स्मारकने सुरुवात झाली असून चौफुलीवर शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारत असल्याने समानता साधली आहे. आम्ही लाल दिव्याच्या गाडीवर नव्हे तर लाल रक्त असलेल्या माणसांवर प्रेम केले. सत्ता गेल्याचे दुःख झाले नाही, परन्तु भाजप शासन राहिले असते तर दोडाईचाला निधी दिला असता. पुनः भाजप शासन येणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. वडाचे झाड लावणारा सात निवडणूकित विजयी होतो. आमदार जयकुमावर रावल आपण झाडे लावा,आपणही यापुढील सात विधानसभा निवडणुका जिंकणार असल्याचाही आशावादही त्यांनी व्यक्त केला.. झाडे ऑक्सिजन देत असून ऑक्सिजनचे महत्व कोरोनात सर्वाना पटले आहे. धनशास्त्र पेक्ष्या पर्यावरण शास्त्र महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.
आ.रावल म्हणाले की, आजचा वृक्षारोपनामुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होणार असून पर्यावरण संतुलित होणार आहे. राजपथावर सिझन नुसार उपयोगाची झाडे व फुलझाडे लावली आहेत. शहीद हमीद यांचे स्मारक उभारणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळाही लवकरच उभरणार आहे. वरवाडे भागात समाज मंदिर बांधले, कचऱ्यापासून मिथेन गॅस निर्मिती होणार आहे, पिण्याचे सर्वाना फिल्टर पाणी देणार. चौथ्या शनिवारी वाहन मुक्त दिवस पाळणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
यावेळी लोकनेते सरकारसाहेब रावल, लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुवरताई रावल, उपनगराध्यक्ष नबु पिंजारी, भाजप जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण महाजन, बांधकाम सभापती निखिल जाधव, पाणीपुरवठा सभापती वैशाली महाजन, कामराज निकम, आरोग्य सभापती कल्पना नगराळे, चंद्रकला सिसोदिया, मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम, डी एस गिरासे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र उपाध्ये, सरचिटणीस जितेंद्र गिरासे, कृष्णा नगराळे, डॉ माधुरी बोरसे, शिंदखेडा नप चे नगराध्यक्ष अनिल वानखेडे, भरतरी ठाकूर, सभापती,सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच रोटरी पतपेढी चेअरमन सुरेश जैन, हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन,किशन दोधेजा, किशन गिरधारीलाल, रमेश पारख, प्रदीप कागणे, मंगला धनगर, युसूफ कादियानी, राजू धनगर, ईश्वर धनगर आदि उपस्थित होते.
कार्यक्रमात दोडाईचा व परिसरात उत्कृष्ट वृक्षारोपण केल्याने माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हस्ते सरकारसाहेब रावल, हस्ती बँकेचे कैलास जैन, अहिंसा ग्रुपचे राजेश मुनोत, माजी नगरसेवक रमेश पारख, कायसिंग भिल यांचा सत्कार करण्यात आला. कायसिंग भिल यांनी वृक्षारोपण केल्याने आमदार जयकुमार रावल यांनी 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. सूत्रसंचालन माजी नगरसेवक ए वाय शेख यांनी, प्रास्ताविक प्रवीण महाजन तर आभार जितेंद्र गिरासे यांनी मानले .