मुंबई : ऍक्ट्रेस परवीन बाबीच्या जीवनावर एक वेबसिरीज बनवली जाणार आहे. प्रोड्युसर स्नेहा रजनी ही वेबसिरीज बनवणार आहे. त्यांनी परवीन बाबीच्या ऑटोबोयोग्राफीची हक्क देखील मिळवले आहेत. करिष्मा उपाध्याय यांनी परवीनचे चरित्र लिहिले आहे. त्यावरच ही वेबसिरीज आधारलेली असणार आहे. परवीन बाबीच्या जीवनावर एक बोयोपिक बनवण्याचा विचार चालू होता. मात्र 3 तासांच्या सिनेमात परवीन बाबीच्या जीवनाबाबतच्या कथानकाला योग्य न्याय देता येणार नाही, असे वाटल्यामुळे वेबसिरीज बनवण्याचे ठरले.
परवीन बाबीचे लहानपण, बॉलिवूडमधील यश, अफेअर आणि शेवटी एकाकीपण यासर्व गोष्टींवर या वेबसिरीजमध्ये प्रकाश टाकला जाणार आहे. परवीन बाबीच्या जीवनातील प्रमुख व्यक्तींमध्ये बिग बी अमिताभ बच्चन आणि निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांचाही समावेश आहे. या ताण तणावाचे दर्शन या वेबसिरीजमध्ये दिसेल. त्यांच्यात अफेअर झाले तेव्हा महेश भट्ट यांचे लग्न झाले होते. पण ते नंतर परवीन बरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये रहायला लागले होते. या ताणामुळे परवीनला मानसिक आजार जडले. ती व्यसनाधीन झाली होती. अखेर एकटेपणातच तिचा मृत्यू झाला होता. यापूर्वी परवीन आणि महेश भट्ट यांच्यातील कथित अफेअरवर 'अर्थ' हा सिनेमा येऊन गेला आहे.