स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा बिग बॅश लीगमध्ये खेळणार

    दिनांक : 27-Sep-2021
Total Views |
सिडनी : भारतीय महिला कि‘केटपटू स्मृती मंधाना व दीप्ती शर्मा आगामी महिला बिग बॅश लीगमध्ये (डब्ल्यूबीबीएल) मध्ये खेळणार असून या दोघी गतविजेत्या सिडनी थंडर संघाचे प्रतिनिधित्व करतील. पुढील महिन्यात सुरु होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने या दोघींसाठी ही स्पर्धा फायदेशीर ठरेल. या दोघीही सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असून त्या मालिकेनंतर 14 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या बिग बॅश स्पर्धेसाठी तिथेच थांबणार आहे.

smruti_1  H x W
 
डावखुरा सलामी फलंदाज 25 वर्षीय स्मृती मंधाना यापूर्वी बिग बॅश लीगमध्ये होबर्ट हरिकेन्स व बि‘स्बेन हिट संघाकडून खेळली होती. अष्टपैलू दीप्ती शर्मा बिग बॅश लीगमध्ये पदार्पण करेल. डाव्या हाताच्या सलामी फलंदाजाला संघात जोडल्याने आम्ही आनंदित झालो आहो. स्मृती ही जागतिक दर्जाची खेळाडू आहे, असे सिडनी थंडर संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर गि‘फीन म्हणाले स्मृतीला 2018 आयसीसी महिला कि‘केटपटू ऑफ द इयर हा पुरस्कारही मिळाला आहे.
दीप्ती इंग्लंडची कर्णधार हिदर नाईटची जागा भरून काढण्यास निश्चित मदत करेल, असे गि‘फीन म्हणाले. गत मोसमात चमकदार कामगिरी करणारी हिदर नाईट यंदाच्या मोसमासाठी उपलब्ध नाही. सिडनी थंडरने माझी संघात निवड केल्यामुळे मी अतिशय आनंदित आहे, असे दीप्ती म्हणाली.