३ लाख ७२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपीला ठोकल्या बेड्या

    दिनांक : 23-Sep-2021
Total Views |
नंदुरबार : जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या चोरीच्या घटनेतील आरोपीकडून ३ लाख ७२ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ndb_1  H x W: 0 
 
वरिष्ठांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत जि.प. शाळेमधील चोरीच्या पध्दतीचा अभ्यास करुन चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस यांची इथ्थंभूत माहिती घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. २३ रोजी पहाटे पहाटे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना चिरडे, ता.शहादा गावात एक इसम कमी किंमतीत व विना बिल पावती इनव्हर्टर व बॅटरी विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन चिरडे येथे खात्री करुन पुढील कारवाई करण्यासाठी पाठविले.
 
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चिरडे येथे सापळा रचून संशयित इसमास इनव्हर्टर व बॅटरीसह ताब्यात घेतले. इसमाने त्याचे नाव सोमनाथ उर्फ सोमा काशिनाथ दशरथ वय २१ रा. सुलवाडे ता. शहादा असे सांगितले. त्यास विश्वासात घेवुन विचारपुसे करता त्याने अजय आंबालाल मोरे (वय-२१) रा. सुलवाडे, ता. शहादा, अजय उर्फ टाईगर राजु पावरा (वय-२२) रा. ब्राम्हणपुरी ता. शहादा यांचे व सुलवाडे व ब्राम्हणपुरी या गावातील तसेच इतर साथीदारांच्या मदतीने नंदुरबार जिल्ह्यातील १८ ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले आहे. गुन्ह्यातील चोरीस गेलेले वस्तूंपैकी ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विविध कंपनीचे एकुण ०९ ल्युमिनस, एक्साईड, मायक्रोटेक कंपनीचे इनव्हर्टर, ०९ एक्साईड बॅटरी, ०२ टीसीएल कंपनीचे एलईडी टीव्ही, ०२ इन्टेक्स कंपनीचे होम थिएटर, ०१ Aऍसर कंपनीचे एलसीडी मॉनिटर, ०१ फॉर्म्युनर कंपनीचा फॅन व गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण ३ लाख ७२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
 
उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम चालु आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या ०९ ल्युमिनस, एक्साईड, मायक्रोटेक कंपनीचे इनव्हर्टर, ९ एक्साईड बॅटरी, २ टीसीएल कंपनीचे एलईडी टीव्ही, २ इन्टेक्स कंपनीचे होम थिएटर, ०१ Aलशी कंपणीचे एलसीडी मॉनिटर, फॉर्म्युनर कंपनीचा १ फॅन जप्त करण्यात आले. शहादा पोलीस ठाणे येथे दाखल असलेले १६, सारंगखेडा येथील १, म्हसावद येथील १ असे एकूण १८ घरफोडीचे गुन्हे उघडकिस आले आहेत.
 
जिल्ह्यातील इतर ठिकाणी झालेल्या घरफोडीचे गुन्हे देखील उघडकीस येतील, असे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस नाईक गोपाल चौधरी, जितेंद्र अहिरराव, विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण, सतीश घुले यांच्या पथकाने केली असून पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील यांनी पथकाचे कौतुक केले .