त्या जाहिरातीवरून आलिया झाली ट्रोल

    दिनांक : 21-Sep-2021
Total Views |
मुंबई :  बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या ती तिच्या या चित्रपटामुळे चांगली चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शीर्षकावरून ती चांगलीच चर्चेत असतांना तिच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. ही एक कपड्यांच्या ब्रँडसाठी केलेली जाहिरात असून आलियाने यामध्ये हिंदू धर्मातील कन्यादान या मुद्द्यावर व्यक्त होताना दिसत आहे. मात्र या जाहिरातीमध्ये मांडलेल्या भूमिकेवरून सध्या ती चांगलीच ट्रोल होत आहे. 
 
aliya_1  H x W:
 
सध्या सोशल मीडियावर आलियाची ही जाहिरात चांगलीच व्हायरल होत आहे. या जाहिरातीत आलिया लग्नाच्या मंडपात बसली असून मुलगी दान करण्याची गोष्ट नाही. त्यामुळे कन्यादान का करावं असा प्रश्न तिने या जाहिरातीत विचारला आहे. मात्र, कन्यादानावर तिने उपस्थित केलेला प्रश्न नेटकऱ्यांना आवडला नाही. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर आलिया आणि या कपड्याच्या ब्रॅण्डला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. मात्र, कन्यादानावर तिने मांडलेली भूमिका अनेकांना खटकली आहे. परिणामी, सोशल मीडियावर आता आलिया चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. केवळ ट्रोलच नाही, तर आलियाने हिंदू धर्माचा अपमान केला आहे. असेही आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत.