नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीने T 20 पाठोपाठ आता आयपीएलचे कर्णधारपद देखील सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विराट कोहली आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरु संघाचे नेतृत्व करत असून या आयपीएल नंतर तो बंगळुरुचे कर्णधारपद सोडणार आहे. 'यंदाची आयपीएल स्पर्धा ही माझी संघाचा कर्णधार म्हणून माझी शेवटची स्पर्धा आहे. पण त्यानंतरही मी आरसीबीचा खेळाडू म्हणून मी खेळत राहणार आहे. माझ्या शेवटच्या आयपीएल सामन्यापर्यंत मी आरसीबीसाठी खेळत राहीन. आजवर माझ्यावर ठेवलेल्या विश्वास आणि मला दिलेल्या पाठिंब्याबाबत मी सर्व चाहत्यांचे आभार व्यक्त करतो', असं कोहलीने म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेनंतर भारताचे T 20 चे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराटने तब्बल 9 वर्ष आरसीबीची कमान सांभाळली आहे. मात्र आरसीबीला एकदाही आयपीएल जिंकवून देण्यात कोहली अपयशी ठरला आहे.