मुंबई : स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही, अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र नसल्याने इयत्ता अकरावीत प्रवेश घेताना अडचण येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करून तात्पुरता प्रवेश घेण्याची सोय करण्यात आली आहे. स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही,अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अडचण येऊ नये यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करून तात्पुरता प्रवेश घेण्याची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.
दुसरीकडे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अनुदानित आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्कात 15 टक्के कपात करून शुल्क जाहीर करण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर देण्यात आली. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रवेश प्रक्रियांसाठी हा नियम लागू आहे.