भूकंपाचा केंद्र बिंदू धनाजे खुर्द
धडगाव : नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव येथे दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनीटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कोणतीही हानी झाली नाही मात्र गावकरी भयभीत झाले आहेत. शहरातील शांतीनगर, लक्ष्मीनगर, बस स्थानक परिसर, धनाजे बु. या भागातील काही घरातील भांड्यांचा तसेच घरावरील पत्र्यांचा आवाज झाला यामुळे नागरिकांना भूकंपाची जाणीव झाली. भुकंपाची तीव्रता 3.2 रिक्टर स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.
धडगाव तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी नागरिकांना घाबरण्याचे काहीही नाही, स्वतःची काळजी घ्यावी. भूकंपाचा आवाज आल्यास नागरिकांनी घरामध्ये न थांबता बाहेर मोकळ्या जागेत थांबावे असे श्री. सपकाळे यांनी आवाहन केले.