मुंबई : देशातील भांडवली बाजारातील तेजीचे सत्र सुरूच असून, आज गुरुवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 123.07, तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी 35.80 अंकांनी वधारला. आजच्या सत्रात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, स्थावर मालमत्ता आणि माध्यम कंपन्यांच्या समभागांना फायदा झाला. निर्देशांक 54,492.84, तर निफ्टी 16,294.60 अंकांवर बंद झाला.
अदानी ट्रान्समिशन, सिप्ला, गेल, अदानी पॉवर, आरईसी, टाटा केमिकल्स, थर्मेक्स आणि इंडिया बुल्सने आज पहिल्या तिमाहीतील कामगिरी जाहीर केली. त्याचा सकारात्मक परिणाम भांडवली बाजारावर झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. आजच्या सत्रात भारती एअरटेल, आयटीसी, टेक महिंद्रासह 12 कंपन्यांच्या समभागांना फायदा झाला. दुसरीकडे भारतीय स्टेट बँक, इंड्सइंड बँक, बजाज फायनान्स आणि इतर काही कंपन्यांच्या समभागांना मात्र आजच्या सत्रात नुकसान झाले.