नंदुरबार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन तसेच नंदुरबार जिल्हा सराफ असोसिएशन तर्फे सोमवार २३ रोजी जिल्हातील सराफी दुकान एक दिवसीय बंद ठेवण्यात येणार आहे.
अव्यवहारिक पद्धतीने लागु केलेल्या हॉलमार्किंग प्रक्रिया, HUID च्या क्लिष्ट व जाचक तरतुदी आणि अनेक कारकुनी व्याप वाढणार असल्याने या कायद्यातील HUID ची तरतुद रद्द करण्यात यावी.त्याचा विरोध म्हणुन हा बंद पुकारण्यात येत आहे. HUID च्या तरतुदीमुळे आमच्या ग्राहकांना देखिल संपुर्ण जाचक तरतुदीला सामोरे जावे लागणार आहे.सुवर्ण व्यापारी बंधुंचा हॉलमार्किंगला विरोध नाही परंतु त्याबाबत ज्या अडचणी व क्लिष्ट तरतुदी आहेत त्या गोष्टीला विरोध असून व्यापाऱ्यांच्या या वस्तुंच्या गुणवत्तेबद्दल विरोध नाही.पण त्या राबवण्याच्या प्रणालीस विरोध आहे. त्यात योग्य तो बदल करून सर्वांना त्याची अंमलबजावणी साधी सोपी कशी होईल.याचा संबंधित विभागाने विचार करावा हे लक्षात आणुन देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील सुवर्ण व्यापारी वर्ग हा एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन तसेच नंदुरबार जिल्हा सराफ असोसिएशन यांनी कळविले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष मनोज श्रॉफ, उपाध्यक्ष जगदिश सोनी, सचिव संजय जैन, सुनिल सोनार यांनी केले आहे.
Attachments area